Ddlpune

Ddlpune We are non-profit online platform dedicated to building equitable resources for Marathi Literature Community

काहीजण रोज वाचताहेत !अजून खूप लोकांना ऐकायचं आहे !
27/02/2022

काहीजण रोज वाचताहेत !
अजून खूप लोकांना ऐकायचं आहे !

ddlpuneIonline repository IMarathi literature I Marathi Kavita I Digital Katta I prernavirendra creations pune साहित्य I कला I विज्ञानवेबसिरिज I पोडकास्ट I डिजिटल निर्मिती Digigtal Archive I I short films I...

काहीजण रोज वाचताहेत !अजून खूप लोकांना ऐकायचं आहे !
27/02/2022

काहीजण रोज वाचताहेत !
अजून खूप लोकांना ऐकायचं आहे !

इंदिरा संत.

विसाव्या शतकातील एक उल्लेखनीय मराठी कवी म्हणजे
साधेपणा,स्वाभाविकता, प्रांजलपणा आणि एक अखंड संवादलय ही त्यांच्या कवितेची वैशिष्टये. रसिकांच्या प्रेमाबरोबरच राजमान्यता लाभलेल्या या कवीला साहित्य अकादमी, जनस्थान आदि प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवले गेले होते.
४ जानेवारी १९१४ रोजी विजापूर जिल्ह्यात इंडी येथे इंदिराबाईंचा जन्म झाला. १३ जुलै २००० रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी बेळगाव येथे वृध्दापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले. फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना कवी व निबंधकार श्री. ना.मा. संत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रथम प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांनी १९७२ सालापर्यंत काम केले.
कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे’ असे त्या स्वतःबद्दल म्हणत. त्यांच्या शेला, मेंदी, रंगबावरी या कवितासंग्रहांना राज्यशासनाचे पुरस्कार लाभले तर गर्भरेशीमला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. १९९५ साली तिसरा जनस्थान पुरस्कार लाभला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्तीही लाभली.
स्त्री जीवनातल्या प्रतिमा निसर्गजीवनात अशा चपखल बसून जातात. कवितेतून जाणवणारे आत्ममग्न, एकाकीपणाचा वसा निष्ठेने जपणारे, अत्यंत तरल, संपन्न, निसर्गजाणीव असलेले, दुःखाला धैर्याने तोंड देणारे आपले स्त्रीत्व विलक्षण मनस्वीपणे त्या आपल्या कवितेतून जपत आल्या आहेत. अनुभवाला कलात्मक रूप देताना एक फसवा सोपेपणा त्यांच्या कवितेत वरवर दिसतो, पण इंदिराबाईंची कविता घट्ट आशयघन आणि वरवरच्या अर्थापेक्षा अधिक काही खोल जाणवून देणारी असते. कवितेचे सर्व घटक सेंद्रिय एकात्मतेने इतके चपखल बसलेेले असतात की त्यातला कानामात्रेचा फरकही कवितेची जान आणि शान बिघडवून टाकील. शब्दांचं पारदर्शित्व आणि हिरकणीच्या प्रत्येक कोनातून सौंदर्याच्या शेकडो छटा पाझराव्यात तसे शब्दांचे बहुविध अर्थलावण्य हे त्यांच्या कवितेचे सामर्थ्य आहे. पंखूट, खळगुल्या, घरकुली, एकुटा, खुलभुल, जळबुंदी, तुषारी अशा अनेक नव्या शब्दरूपांचा वापर वाचकांच्या हृदयापर्यंत नेमकेपणाने अर्थ पोचण्यासाठी त्या करतात. त्यांची कविता व्यामिश्र आहे, पण जटिल, दुर्बोध नाही, दुःख आहे, पण कटुता वा विखार नाही. अत्यंत तरल अबोध, अमूर्त अशा भावानुभूतींना नेमक्या तपशीलांनी तंतोतंत साकारण्याची कुशल चितार्‍याची कला त्यांच्यात जात्याच आहे.
भावकवितेचे काही चांगले गुण त्यांनी आत्मसात केले. प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार, निसर्गाशी नाते, अकृत्रिम लयबध्दता, छंद, जातीचा वापर यातून त्यांची कविता मुक्तपणे आविष्कृत झाली, म्हण्ूनच त्यांची कविता आजही जुनी वाटत नाही. नवकवितांच्या संभारात त्यांचा ताजेपणा अजूनही टिकून आहे

ddlpune पॉडकास्ट मालिकेत अभिवाचक म्हणून सहभागी होऊ शकाल ! ...  त्यासाठी संपर्क : ९०९६२७९८९६ ddlpune
17/07/2020

ddlpune पॉडकास्ट मालिकेत अभिवाचक म्हणून सहभागी होऊ शकाल ! ... त्यासाठी संपर्क : ९०९६२७९८९६ ddlpune

16/07/2020

दादांची डिजिटल लायब्ररी
Ddlpune काय आहे ..?

मित्रांनो ! डिजिटल लायब्ररी काय आहे ? असा प्रश्न आम्हाला खूप वेळा विचारला जातो. त्यावर हे....
साहित्यावर,संगीतावर प्रेम करणारा,चित्रकला-शिल्पकला,विविध लोककलां आणि अनेक दर्जेदार नाटकांचा चाहता आणि चोखंदळ असा जगभरातील रसिक-प्रेक्षक-वाचकवर्ग मोबाईल-इंटरनेटच्या माध्यमातून जोडला गेला आहे.ज्यात विविध वयोगटातील कला साहित्यावर प्रेम करणारे लोक साहित्य वाचण्याची,ऐकण्याची आणि बघण्याची इच्छा बाळगतात. ह्या सर्वांचाच हा ''ऑनलाइन डिजिटल कट्टा'' आहे. पुस्तक रूपातील लिखित कथा,कविता,नाटकं किवा पारंपारिक ओव्या,अध्यात्मिक गद्य-पद्य इत्यादी उपलब्ध सर्व वाचिक वाड्मय यावर आधारित कार्यक्रमांची ऑडीओ आणि व्हिडीओ स्वरुपात पुनर्निर्मिती करून असे कंटेंट डिजिटल माध्यमावर आणि सोशल माध्यामांवर प्रकाशित आणि प्रसिद्ध केले जातात.

निर्मितीसाठी विविध प्रकारे कवितेचे किंवा लघुकथेचे नाट्य सादरीकरण,वाचिक अभिनिवेशाने निवेदन किंवा लघुपट,मुलाखत आणि नाट्य, असे वर्गीकरण करून संहिताबद्ध रूपरेषा आखली जाते. वेबमालिका किवा पॉडकास्टिंग ऑडीओ, वाचकांचे सादरीकरणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, अभिनय,वाद्य वादन आणि शिल्पकला किवा चित्रकलेवर आधारित कार्यक्रम निर्मितीसाठी कलाकारांना पाचारण करून सर्व वयोगटातील कलाकारांना सहभाग दिला जातो.आणि सर्वांना पुन्हा पुन्हा आस्वाद घेता यावा यासाठी या सर्व कार्यक्रमांचे डिजिटल अर्काइव्ह तयार केले जाते..
पुस्तकातील निवडक साहित्य पॉडकास्ट सिरीज,वेब व्हिडिओ सिरीज आणि इतर अनेक मालिकातुन वेबसाईट वरून प्रसारीत केले जाते....
हिच दादांची डिजिटल लायब्ररी.ddlpune

https://www.youtube.com/watch?v=k0sKoOwHy_Q&t=1s
16/07/2020

https://www.youtube.com/watch?v=k0sKoOwHy_Q&t=1s

DDL म्हणजेच दादांची डिजिटल लायब्ररी प्रस्तुत साहित्याचा श्रवणीय आनंद देणारी साप्ताहिक ऑडीओ मालिका "ऐकू आनंदे"- ४ क.....

रंगकर्मी अतुल पेठे यांनी     पॉडकास्ट  मालिकेसाठि केलेलं अभिवाचन मला उमजलेले निळूभाउ
27/06/2020

रंगकर्मी अतुल पेठे यांनी पॉडकास्ट मालिकेसाठि केलेलं अभिवाचन मला उमजलेले निळूभाउ

DDL म्हणजेच दादांची डिजिटल लायब्ररी प्रस्तुत साहित्याचा श्रवणीय आनंद देणारी साप्ताहिक ऑडीओ मालिका "ऐकू आनंदे"- ६ ल.....

नवीन मालिकेत अभिवाचक म्हणून सहभागासाठी १० जुलै पूर्वी संपर्क करावा : ddlpuneमराठी  ९०९६२७९८९६ !              ाहित्य  ाठी...
27/06/2020

नवीन मालिकेत अभिवाचक म्हणून सहभागासाठी १० जुलै पूर्वी संपर्क करावा : ddlpuneमराठी ९०९६२७९८९६ !

ाहित्य ाठी #ऐकूआनंदे #वाचूआनंदे #वाचाआनंदे #मराठी #आम्हीडिजिटलसाहित्यिक #नवोदितकट्टा

जेष्ठ बाल साहित्यिक संगीता बर्वे  यांनी सादर केलेली त्यांचीच एक सुंदर कविता     डीडीएलपुणे ऐकू आनंदे या पूर्वप्रसारीत मा...
25/06/2020

जेष्ठ बाल साहित्यिक संगीता बर्वे यांनी सादर केलेली त्यांचीच एक सुंदर कविता डीडीएलपुणे ऐकू आनंदे या पूर्वप्रसारीत मालिकेतील !

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. संगीता राजीव बर्वे (माहेरच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावच्या संगीता प्रभाकर गोंगे) या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. संगीताचे वडील शाळेत चित्रकला शिक्षक होते. संगीताबाईंना इयत्ता चवथीपासून कागदावर शब्द उमटविण्याचा छंद लागला.
संगीता बर्वे या प्रख्यात गायिका मालती पांडे यांच्या स्नुषा आहेत.
मुळशी तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात झालेल्या २६व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या..

प्रेरणाविरेंद्र निर्मित दादांची डिजिटल लायब्ररी प्रस्तुत "ऐकू आनंदे" भाग -२ दिग्दर्शन-प्रेरणा आणि विरेंद्र निर्....

वसंत आबाजी डहाके यांनी सादर केलेली  त्यांचीच एक सुंदर कविता       डीडीएलपुणे  ऐकू आनंदे या पूर्वप्रसारीत  मालिकेतील  ! व...
24/06/2020

वसंत आबाजी डहाके यांनी सादर केलेली त्यांचीच एक सुंदर कविता डीडीएलपुणे ऐकू आनंदे या पूर्वप्रसारीत मालिकेतील !

वसंत आबाजी डहाके (३० मार्च १९४२ -हयात ) हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत.१९६६ साली 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. "चित्रलिपी" या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.[१] फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
Vasant Abaji Dahake

DDL म्हणजेच दादांची डिजिटल लायब्ररी प्रस्तुत साहित्याचा श्रवणीय आनंद देणारी साप्ताहिक ऑडीओ मालिका "ऐकू आनंदे" भाग ...

एक आठवण !
23/06/2020

एक आठवण !

दादांची डिजिटल लायब्ररी प्रस्तुत मराठी भाषा दिवस २०१८ आयोजक दादांची डिजिटल लायब्ररी संकल्पना दिग्दर्शन-विरेंद....

27/05/2020

#मराठीकविता #मराठीकथा #मराठीकवी #मराठीलेखक #मराठीलेखिका #मराठीकट्टा #मराठीडिजिटलकट्टा #मराठी #मराठीगाणी #मराठीसाहित्य #मराठीबाणा #मराठीमायबोली #मायबोली #मराठीकाव्य #मराठीगोष्टी #वाचाआनंदे ाहित्य #आम्हीडिजिटलसाहित्यिक #डिजिटलसाहित्यिक ाहित्य ाठी #ऐकूआनंदे #नवोदितकट्टा

Address

Pune

Opening Hours

Saturday 12pm - 8pm
Sunday 12am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ddlpune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ddlpune:

Share