Achievers Computer Center,Akot

Achievers Computer Center,Akot Mkcl Authorized center
Achievers Computer Training Center,Akot
Ms-cit Center, Klic Course Center

23/02/2026
---------२० हजार रुपयांचा मोफत कंप्युटर डिप्लोमा कोर्स ---------मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा कुणबी या समाजातील बह...
30/09/2024

---------२० हजार रुपयांचा मोफत कंप्युटर डिप्लोमा कोर्स ---------

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा कुणबी या समाजातील बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत...तर या घटकांचे शेतीवरील अवलंबित्व कमी करून त्यांना विविध क्षेत्रातील रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करणे, शेतकरी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे, शेतकऱ्यांच्या तसेच महिलांचा ताणतणाव कमी करण्यासाठी उपाययोजना करणे...यासाठी या गटातील समाज हा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी सुनियोजित उपाययोजना कालबद्ध पद्धतीने करण्याचा सारथी संस्थेचा मानस आहे...यासाठी ही संस्था पुणे येथे १९ फेब्रुवारी २०१९ पासून कार्यरत आहे...सारथी संस्थेमार्फत या समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत...यापैकीच एक म्हणजे या समाजातील मुलांना या योजनेअंतर्गत ६ महिन्यांचा मोफत संगणक डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आलाय...एमकेसीएल आणि सारथी या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कोर्स सुरू करण्यात आलाय...एमकेसीएलची स्थापना वीस वर्षांपूर्वी झाली असून हे महाराष्ट्र शासनाचे महामंडळ आहे...विशेष म्हणजे एमकेसीएलने आतापर्यंत एमएस-सीआयटी या कोर्सच्या माध्यमातून दीड कोटी तरुणांना आणि तरुणींना संगणक साक्षर केलंय...या कोर्ससाठी उमेदवाराकडून २ हजार रुपये एवढी अनामत रक्कम घेण्यात येणार असून ही रक्कम कोर्स पूर्ण झाल्यानंतर परत दिली जाणार आहे...खासगी आस्थापनांमध्ये नोकरीसाठी इच्छुक असणारे उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतात...या कोर्ससाठी उमेदवाराने दररोज ३ तास उपस्थित राहणं अनिवार्य असणार आहे...तसेच या कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवाराचं वय हे १८ ते ४५ वर्षांच्या मध्ये असावं...उमेदवार किमान दहावी पास असावा, उमेदवाराच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे...तसेच उमेदवाराला महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य असणार असून या कोर्ससाठी लागणाऱ्या संपूर्ण कागदपत्रांची यादी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलीये...

उमेदवारांसाठी खालील प्रकारची कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे :
🔸 जात प्रवर्ग: मराठा
१) ‘मराठा जात प्रमाणपत्र
२) नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र किंवा ‘EWS प्रमाणपत्र’

🔸 जात प्रवर्ग: कुणबी
१) OBC प्रमाणपत्र
२) नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र किंवा मागील 3 वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र

🔸 जात प्रवर्ग: कुणबी-मराठा
१) OBC प्रमाणपत्र
२) नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र (जारीची तारीख, प्रमाणपत्र पर्यंत वैध) किंवा मागील 3 वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र

🔸 जात प्रवर्ग: मराठा-कुणबी
१) OBC प्रमाणपत्र
२) नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र किंवा मागील 3 वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र

सोबत जोडावयाचे इतर आवश्यक कागदपत्रे:
१) आधार कार्ड
२) महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
३) 10 वी उत्तीर्ण, पदवीधर प्रमाणपत्र / मार्कशीट
४) जन्मतारीख आणि वयाचा पुरावा
५) फोटो आणि सही

अधिक माहितीसाठी अधिकृत केंद्राला भेट द्या..
अचिवर्स कंप्युटर सेंटर, अकोट
पत्ता - मोठे बारगण पान मार्केट अकोट.
संपर्क - 9356338081,8007389525 (निखिल गुजर सर)
👉

आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Whats app - https://chat.whatsapp.com/Fam9l7gqmtHAUnH1nCKEzp
Facebook: https://www.facebook.com/share/mh1Sq7HKgkLrtjYk/?mibextid=qi2Omg
Instagram: https://www.instagram.com/achieverscomputercenter?igsh=NjZzMXlrYXB2dmxh

Address

Mothe Bargan Pan Market
Akot
444101

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8:26pm

Telephone

+919356338081

Alerts

Be the first to know and let us send you an email when Achievers Computer Center,Akot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Achievers Computer Center,Akot:

Share