28/01/2022
*आपल्या सर्व बांधवांना आणि भगिनींना न्रम विनंती आहे ई श्रमिक कार्ड काढावे* 🌹🙏🏼🌹
👉🏻 *सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा *"महामहोत्सव"*सुरु झाला आहे.*
*👉🏻असंघटीक कामगारांना हक्क मिळवून देणाऱ्या योजनेचा प्रारंभ .....👈🏻*
*👉🏻योजनेचे फायदे👈🏻*
👉🏻1) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.
👉🏻2) सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल.
👉🏻3) सरकारला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात त्यांनाच होईल.
👉🏻4) हे कार्ड तयार केल्यास असंघटीत कामगारांना सरकारकडून 1 वर्षांसाठी विमा मोफत दिल्या जाईल.
👉🏻5) तसेच असंघटीत कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे.
*📝 ई-श्रम कार्ड 📝*
🆓अतिशय महत्वाचे🆓
*✍🏻नोंदणी केल्यानंतर १० मिनिट मध्ये स्मार्ट कार्ड उपलब्ध आणि योजनेचे सर्व लाभ घेण्यासाठी आपण पात्र असाल✍🏻* ★स्मार्ट कार्ड शुल्क अतिरीक्त
*📢महानोंदणी असंघटित कामगारांची📢*
*आजच आपली आणि आपल्या कुटूंब सदस्याची नोंदणी करून घ्या आणि विविध सुविधांचा लाभ घ्या*
*असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत ?*
१. *लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर*
२. *पशुपालन करणारे*
३. *सेल्समन*
४. *बांधकाम कामगार*
५. *सेंट्रिंग कामगार*
६. *किराणा/ बेकरी/ पानपट्टी/ इत्यादी सर्व दुकानदार*
७. *सुतार*
८. *वीटभट्टीवर काम करणारे*
९. *न्हावी*
१०. *घरगुती कामगार*
११. *भाजीपाला विक्रेते*
१२. *फळ विक्रेते*
१३. *वृत्तपत्र विक्रेते*
१४. *हातगाडी ओढणारे*
१५. *ऑटो रिक्षा चालक*
१६. *घरकाम करणारे कामगार*
१७. *आशा वर्कर*
१८. *दूध उत्पादक शेतकरी*
१९. *सामान्य सेवा केंद्रचालक*
२०. *स्थलांतरित कामगार*
२१. *अंगणवाडी सेविका*
२२. *खाजगी क्लासेस संचालक*
२३. *विडी कामगार*
यासारखे असे अनेक लोक आहेत त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून
*शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे.*
*👉🏻ई- श्रम (E- SHRAM )* कार्ड
(आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे.
*👉🏻ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.👈🏻*
✔️ *इ श्रम नोंदणी साठी निकष*
👉🏻१. ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी.
👉🏻२. ती व्यक्ती इनकम टॅक्स भरणारी नसावी.
👉🏻३. ती व्यक्ती EPFO व ESIC ची सदस्य नसावी.
👉🏻४. वरील कामगार श्रेत्रात काम करणारी असावी.
✍🏻 *ई- श्रम नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे*
👉🏻१. आधार कार्ड
👉🏻२. मोबाइल नंबर
👉🏻३. बँक पासबुक
👉🏻४. शैक्षणिक माहिती
*असंघटीक कामगारांना हक्क मिळवून देणाऱ्या योजनेचा प्रारंभ .....*
========================== *सर्व प्रकारच्या भरती, परीक्षा, ऍडमिशन व सरकारी योजना , शेती विषय योजना , शासकीय दाखले , बैंक योजना अपडेट साठी*
संपर्क- दिपक मांढरे, आपले सरकार सेवा केंद्र, रेल्वे चौक, बल्लारपूर, मो. 9890830585