20/06/2020
कोणी तरी आपल्याला काहीतरी सांगत आणि आपण ऐकतो, दुसऱ्या देशाचे product आपल्या देशात येऊ द्यायचे की नाही ही देशाची policy असते जी देशाचे सरकार ठरवते. दुसऱ्या देशाशी कसे संबंध ठेवायचे, कोणासोबत युद्ध करायचे हे ही सरकार ठरवते, मुळात हे आपलं काम नसतंच..
आपलं काम असत शिक्षण, नोकरी, business, शेती व इतर ज्यामधून देश प्रगत आणि समर्थ बनतो.. आपण काय करतो, हे सोडून देशा बाहेरच्या विषयात वेळ वाया घालतो आणि देशाला गरीब आणि दुसऱ्यावर dependent ( जस की चीनवर) बनवतो, आणि काही चिमूटभर नेत्यांना श्रीमंत करतो..
कोणताच देश वाईट नसतो, तो फक्त आपला देश पुढे कसा जाईल याचा विचार करत असतो आणि ते फक्त त्या देशाचे लोक करू शकतात..
ज्या देशात दुसऱ्या देशाविषयी काही चिमूटभर नेते तेथील जनतेत द्वेष भरून जगात असतील तो देश प्रगत कसा होणार??
आपण आले काम करावे, सरकारने त्यांचे काम करावे..